Translate

Money Lending License / सावकारी व्यवसाय परवाना मिळवण्यासाठी सोपी पद्धत.





Money Lending License
Money Lending License


स्वयंघोषणापत्र डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

/self declaration download :- https://rzp.io/l/gm0X4bTBj


नमस्कार, मित्रानो सावकारी व्यवसाय साठी किंवा फायनान्स साठी  लागणारा  परवाना कसा काढावा कागदपत्रे काय काय लागतात असे खूप  शंका  आपल्या मनामध्ये असतात पण आपण परवाना काढण्यापूर्वी जर पूर्ण माहिती मिळून जर आपण परवाना काढण्यास प्रयत्न केल्यास आपल्याला सहज रित्या परवाना मिळेल आणि आपले होणारे व्यर्थ धावपळ पण टाळता येईल. त्यासाठी लागणारे कागदपत्रे, अर्ज कुठे करावे, अर्ज करण्याचे पद्धत कशी आहे अश्या सर्व बाबी जाणून घेणे आवश्यक असते. 

सावकारी व्यवसाय परवानासाठी अर्ज करण्यासाठी हा व्हिडीओ  पहा -
 

सावकारी व्यवसाय परवण्यासाठी अर्ज कसे करावे. 

मित्रानो सावकारी व्यवसायाचा परवाना मिळवण्यासाठी सहकार विभागाने ऑनलाईन पद्धतीन अर्ज करण्याचे सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी आपले सरकार पोर्टलवर ज्यांच्या नावाने परवाना काढायचा आहे. त्यांचे नोंदणी करावे त्यानंतर लॉगिन करून त्यामधून सहकार पणन व वस्त्रउधोग विभाग निवडावे त्यामधून  नवीन परवान्यासाठी अर्ज किंवा नूतनीकरणासाठीचा अर्ज निवडून सदर फॉर्म पूर्णपणे भरून घ्यावे नंतर कागदपत्रे जोडावीत नंतर शुल्क भरणा करावे. शुल्क भरणा करण्यासाठी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI चे वापर करून शुल्क भरणा करता येईल. 

 आपले सरकार पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी हा व्हिडीओ पहा -
 

 सावकारी व्यवसायाचा परवाना मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. 

 ऑनलाईन पद्धतीने आपले सरकार पोर्टल वरुन सावकारी व्यवसाय परवाना काढण्यासाठी खलील कागदपत्रांचे गरज आहे. 

ओळकीचा पुरावा 

1) पॅन कार्ड 
2) मतदान कार्ड
3) प्रॉपर्टि टॅक्स 
4) प्रॉपर्टि कार्ड 
 ओळीचा पुरावा साठी कोणतेही एक कागदपत्र जोडावे 

पत्त्याचा पुरावा  

 1) बँक स्टेटमेंट 
1) रेशन कार्ड 
3) भाडे करार 
4) आधार कार्ड
5) पासपोर्ट
6) ड्राइविंग लायसन्स
7) मतदान ओळख पत्र 
 पत्याच्या पुराव्यासाठी कोणतेही एक कागदपत्र जोडावे.

इतर कागदपत्रे.

 1) अर्जदाराचे एक फोटो.
2) स्वयंघोषणापत्र.
3) चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
4) सदर गुन्याबत मिळालेले आदेश

इतर कागद्पत्रामधील अर्जदाराचे फोटो आणि स्वयंघोषणापत्र जोडणे अनिवार्य आहे. आणि चारित्र्य पडताळणी
आणि गुन्हा बाबत आदेश जर अर्जदारविरुद्ध आयपीसी किंवा इतर कायद्यान्वये कोर्टाने दोषी आढळले असल्यास
किंवा गुन्हा दाखल झाले असल्यास जोडावे.

सावकारी व्यवसाय परवण्यासाठी अर्ज केल्यानंतर पुढे काय करावे.


सावकारी परवण्यासाठी अर्ज केल्यानंतर अर्जदारने आपले सरकार पोर्टल एक दोन दिवसातून एकदा लॉगिन करून
पहावे अर्ज केळ्यांनातर थोड्याच दिवसात आपल्याला पोर्टल वर एक समन्स मिळेल त्या समन्स मध्ये दिलेल्या
 तारखेला आणि वेळेला आपले सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समन्स मध्ये दिलेल्या सबंधित सहायक निबंधक
कार्यालयात जबाबासाठी उपस्थित राहावे.

सावकारी व्यवसाय लायसन्सला  मंजूरी कशी व कुठे मिळते. 

 सावकारी परवान्यासाठी अर्ज केल्यानंतर तालुख्याच्या ठिकाणी असलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे आपले अर्ज जातो. त्यानंतर त्या अर्जावर तपासणी करून भरलेले अर्ज आणि जोडलेले कागदपत्रे यांची तपासणी केली जाते. त्यांनातर बरोबर असल्यास अर्जदारास जबाबासाठी समन्स पाठवले जाते. त्यानंतर अर्जदाराचे जबाब झाल्यानंतर सबंधित अर्जावर योग्य ती कारवाही करून सदर अर्ज. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पाठवले जाते त्यानंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात त्या अर्जाची पडताळणी होते भरलेले फॉर्म जोडलेले कागदपत्र यांची पडताळणी झाल्यानंतर संबधित जिल्हा उपनिबंधक यांनी सावकारी व्यवसाय करण्यासाठी परवानगी देतात आणि त्याचे लायसन्स प्रत आपल्याला मिळते. 

 सावकारी व्यवसाय लायसन्सला मंजूरी का आणि

केंव्हा मिळत नाही

 सावकारी व्यवसाय लायसन्स जेंव्हा आपण अर्ज करतो त्यावेळी आपण पूर्ण माहिती घेऊन अर्ज करत नाही. आपण ज्यावेळी अर्ज करतो त्यावेळी फॉर्म पूर्ण वाचून समजून भारावे. कागदपत्रे जोडताना स्पष्ट दिसतील असेच कागदपत्रे जोडावे. आपण चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरल्यास सदर अर्ज सहायक निबंधक कार्यालयात नाकरण्यात येते किंवा अर्जाला त्रुटि लागून परत पाटवले जाते. किंव्हा एकाद्यावेळेस जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सुद्धा आपल्या अर्जात काही त्रुटि आढळल्यास परत पाठवले जाते.  आशयावेळी अर्जदारानी आपले सरकार पोर्टल लॉगिन करून आपल्या अर्जाला लागलेल्या त्रुटि सुधारणा करून फेर सादर करावे. 

 सावकारी व्यवसाय लायसन्सला लवकर मंजूरी मिळत नसल्यास

किंवा भरलेले फॉर्म आणि जोडलेले कागदपत्रे योग्य असताना देखील

 चुकीच्या पद्धतीने त्रुटि लागत असल्यास काय करावे? / अपील कसे करावे.

 सावकारी लायसन्सचे अर्ज काही वेळा  भरपूर दिवस तसेच पडून राहते त्यावर काही सुद्धा प्रक्रिया केली जात नाही त्यामुळे ते पेंडिंग मध्ये दाखवत असते. किंवा भरलेले अर्ज आणि कागदपत्रे सर्व बरोबर जोडून देखील आपले अर्जास वारंवार त्रुटि लागत असते अश्या वेळेस आपले पोर्टल मध्ये उपलब्ध असलेल्या अपील वर क्लिक करून अर्जदार अपील करू शकतो.  


 सावकारी व्यवसाय परवाना मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसे करावे आणि इतर भरपूर महितीसाठी आमचे YouTube चॅनेलला सब्स्क्राईब करा.


सावकारी व्यवसाय आणि परवाना याबत नवीन अधिक महितीसाठी सबधित सहकार विभागाच्या सहायक निबंधक कार्यालयाशी संपर्क साधा.




असेच भरपूर माहिती मिळवण्यासाठी आणि माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा -https://www.youtube.com/dhanshrigroup


धन्यवाद !

Post a Comment

5 Comments

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. Microfinance badal mahiti sanga &parwana kase milel

    ReplyDelete
  3. sir piz send pdf i am sending payment but not send me savkar licence self declaration .

    ReplyDelete
  4. काढलेले सावकारी लायसन्स एक वर्ष मुदतीचे आहे,ते नूतनीकरणासाठी काय प्रोसेस आहे.

    ReplyDelete