Income Certificate |
तहसीलदार यांच्याकडून मिळकतीचे प्रमाणपत्र / उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठीचे प्रक्रिया.
उत्पन्नाचा दाखला शासकीय योजनेसाठी, शिक्षणासाठी इतर योजनेसाठी महत्वाची असते. उत्पन्न दाखला मिळण्यासाठी बरोबर आणि योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यास खूप कमी दिवसात उत्पन्न दाखला मिळू शकते उत्पन्न दाखला कशाप्रकारे मिळवावा अर्ज कुठे करावा यासंबंधी दित पूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.
उत्पन्नाचा दाखला अर्ज केल्यापासून 15 दिवसाच्या आत मिळाले पाहिजे. उत्पन्नाचा दाखला नायब तहसीलदार यांच्याकडून मिळते किंवा तहसीलदार
यांच्याकडून देखील मिळू शकते. जर एखाद्यावेळेस उत्पन्न दाखला मिळण्यास विलंब
झाल्यास किंवा सर्व कागदपत्रे बरोबर असताना देखील अर्ज नाकारल्यास किंवा रद्द
झाल्यास आपण माननीय तहसीलदार
यांच्याकडे अपील करू शकतो त्यांनीदेखील सर्व कागदपत्रे बरोबर असताना दाखला देण्यास
विलंब केल्यास किंवा अर्ज नाकारल्यास किंवा रद्द केल्यास आपण उपविभागीय अधिकारी
यांच्याकडे अपील करू शकतो.
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
ओळखीच्या पुराव्यासाठी खालील किमान एक कागदपत्रे जोडावी.
1) पॅन कार्ड
2) आधार कार्ड
3) मतदान कार्ड
4) वाहन चालक अनुज्ञप्ती
5) आर एस बी वाय कार्ड
6) रोजगार हमी जॉब कार्ड
हे कागदपत्रे जोडू शकतो
उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पत्त्याचा पुरावा म्हणून खालील किमान एक कागदपत्रे जोडावी.
- विज देयक (
लाईट बिल)
- भाडे पावती
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- दूरध्वनी देयक ( फोन बिल)
- पाणी पट्टी पावती
- मालमत्ता कर पावती
- मतदान यादी चा उतारा
- वाहन चालक अनुज्ञप्ती
- मालमत्ता नोंदणी उतारा
- 7बारा 8अ चा उतारा
उत्पन्नाचा पुरावा म्हणून खालील किमान 1 कागदपत्रे जोडावे.
1.
आयकर विवरण पत्र
2.
वेतन मिळत असल्यास
फॉर्म नंबर 16
3.
निवृत्तीवेतन
धारकासाठी बँकेचा प्रमाणपत्र
4.
जमीन मालक असल्यास
सात-बारा आणि आठ अ चा उतारा व तलाठी अहवाल जोडावे.
इतर कागदपत्रे आवश्यक असल्यास जोडावे.
- वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आरोग्य किंवा
वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.
- पुरावा म्हणून जन्मदाखला, शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र,
प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा, सेवा पुस्तिका
यापैकी एक कागदपत्रे जोडावी
उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज कोठे करावा?
उत्पन्न दाखला
मिळण्यासाठी सर्व संबंधित कागदपत्रे घेऊन आपले सरकार सेवा केंद्र किंवा शेतू
केंद्र या ठिकाणी जावे.
किंवा आपले सरकार पोर्टल वर नागरिकांचा
लॉग इन वापरून उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज करता येते.
उत्पन्न दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर काय प्रक्रिया होते.
उत्पन्न दाखल्यासाठी
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आपला अर्ज तहसील कार्यालयातील क्लार्कच्या टेबल जाते त्यानंतर
आलेल्या अर्जाची पूर्ण तपासणी करून योग्य असल्यास पुढे नायब तहसीलदार यांच्याकडे
पाठवला जातो किंवा काही ही त्रुटी असल्यास अर्ज त्रुटी लावून माघारी
पाठवण्यात येते. त्यानंतर त्या त्रुटीची पूर्तता करून अर्ज पुन्हा सादर करावा
लागतो. किंवा बरोबर असल्यास तहसील कार्यालयातील क्लार्क यांनी नायब तहसीलदार
यांना पाठवल्यानंतर नायब तहसीलदार यांनी आलेला अर्जाची पूर्ण तपासणी करून मंजुरी
देतात.
संजय गांधी निराधार
योजना किंवा श्रावणबाळ योजना किंवा इतर साठी लागणारा 21000 उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पुढील प्रक्रियेचा अवलंब करावा.
21 हजाराच्या उत्पन्न
दाखल्यासाठी केल्यानंतर तहसीलदार कार्यालयातील क्लार्क यांच्या टेबलला जाईल
त्यानंतर त्यांनी अर्जाची तपासणी करून सर्कल चौकशी अहवाल साठी अर्ज माघारी
पाठवण्यात येईल त्यानंतर अर्जदाराने संबंधित अर्जाला लागलेल्या त्रुटी नुसार सर्कल
चौकशी अहवाल जोडून अर्ज पुन्हा सादर करावे त्यानंतर सदर अर्ज मंजुरी मिळेल. आणि उत्पन्न दाखला आपण मिळवू शकता.
8 Comments
setu arja format dya sir
ReplyDeleteसर मला सावकारी परवाना काढायचा आहे, मला नाही काढायला जमणार कोणी काढून देत असल तर प्लीज मला फोन करा 9763696861/9292039292
ReplyDeletesir mala setu chi sakt jaruri ahe .. plz sir koncha setu asel tr mala dya me serivce nakki dyeil.
ReplyDeleteform murtizapur Dist akola stat maharashtra 444107
उत्पन्नाचा दाखला काढताना 16 नंबर मधील कोणते उत्पन्न् घ्यावे
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteThank you for sharing such an amazing article on income Certificate. Income certificate can be used by individuals to get benefits from various Government Schemes.
ReplyDeleteESIC online payment is a new way of payment which helps workers and employers in India to pay their share of contribution at esic portal.
Very Good Informatio Thank You
ReplyDeleteGood post
ReplyDeleteNCVT Online