Translate

बँकेचे ग्राहक सेवा केंद्र कसे घ्यावे. How to get bank customer service point.

Bank BC
Bank BC


बँकेचे ग्राहक सेवा केंद्र सुशिक्षित बेरोजगारांसाठी ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील एक उत्पन्नाचे चांगले साधन बनले आहे. यामध्ये ग्राहक सेवा केंद्र चालकाने बँकेचे सेवा त्यांच्या भागांमध्ये किंवा त्यांच्या गावांमध्ये पोचवायचे असतात आणि त्या मोबदल्यात बँक मित्रांना  बँकेकडून  कमिशन मिळते. सध्या बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेण्याकडे चांगले शिक्षण घेतलेले व्यक्ती सुद्धा  वळत असल्याचे दिसत आहे.  याचे कारण  म्हणजे मोठ्या बँकेमध्ये जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी बँक, आय सी आय सी बँक, पंजाब नॅशनल बँक,  सिंडिकेट बँक,  युनियन बँक  आणि इतर काही मोठ्या बँका यामध्ये खूप मोठी गर्दी असते या गर्दीचा त्रास सर्वसामान्य जनतेना होत असते यामुळे बँकेने प्रत्येक गावांमध्ये किंवा प्रत्येक भागांमध्ये बँकेचे ग्राहक सेवा केंद्र देतात. आणि त्या अंतर्गत बँकेचे काही सेवा दिल्या जातात यामुळे सर्वसामान्य जनतेची सोय होते आणि बँकेचे सेवा सुद्धा जलद गतीने ग्राहकांपर्यंत मिळतात. यामुळे लोकांना लवकर सेवा मिळते आणि बँकेला पण त्यातून काही नफा होतो. यामुळे या व्यवसायातून ज्यांच्याकडे रोजगार नाही अशांसाठी एक चांगला वाव आहे.


 बँकेचे बीसी घेण्यासाठी किंवा ग्राहक सेवा केंद्र चालू करण्यासाठी शिक्षणाची अट काय आहे.


 बँकेचे बीसी घेण्यासाठी किंवा ग्राहक सेवा केंद्र चालू करण्यासाठी किमान दहावी पास होणे गरजेचे आहे. त्यासोबत  संगणकाचे देखील ज्ञान असणे गरजेचे आहे. कारण म्हणजे सध्या सर्व बँकेचे काम ऑनलाईन पद्धतीने झालेले असल्यामुळे सध्या ग्राहक सेवा केंद्र चालकाला संगणक चालवता येणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व डिजिटल ट्रांजेक्शन करणे सोपे होईल.




बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेण्यासाठी  कोणती साहित्य असणे गरजेचे आहेत.


 बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेण्यासाठी किंवा मिळाल्यानंतर आपल्याकडे एक संगणक त्यानंतर एक बायोमेट्रिक डिवाइस एक प्रिंटर आणि इंटरनेटची सोय असणे गरजेचे आहे.

    त्याच बरोबर आपल्याकडे कमीत कमी आपल्या गाळ्यांमध्ये पाच ग्राहक बसतील एवढा सोय करणे गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांना त्यांना बसण्याची सोय व्हावी आणि त्यांना चांगली सेवा आपल्या कडून देता यावी.


बँकेचे ग्राहक सेवा केंद्र किंवा बीसी पॉईंट घेण्यासाठी कोणते कागदपत्रे गरजेचे आहेत.


 बँकेचे ग्राहक सेवा केंद्र बी सी पॉईंट घेण्यासाठी खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहेत.

  1.  आधार कार्ड

  2.  पॅन कार्ड

  3.  बँक पासबुक

  4.  IIBF  प्रमाणपत्र

  5.  शैक्षणिक प्रमाणपत्र

  6.  संगणकाचे ज्ञान असलेले प्रमाणपत्र

  7.  चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र

हे कागदपत्रे असणे गरजेचे आहे.



बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेण्यासाठी किंवा बी सी पॉईंट घेण्यासाठी कोठे व कसा अर्ज करावा.


 बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेण्यासाठी किंवा बी सी पॉईंट घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने आपल्याला कोणत्या बँकेचे बीसी पॉइंत घ्यायचे आहे.  त्या बँकेच्या शाखेत जावे तेथील बँकेचे शाखा व्यवस्थापक( ब्रँच मॅनेजर)  यांना  बँकेचे ग्राहक सेवा केंद्र मिळण्यासाठी लेखी स्वरूपामध्ये अर्ज द्यावा त्या अर्जासोबत संबंधित कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, IIBF  प्रमाणपत्र,  चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, असल्यास संगणकाचे ज्ञान असलेले प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्रे जोडून द्यावे. त्यानंतर सदरचा अर्ज संबंधित ब्रँच मॅनेजर घेतल्यानंतर आपण ज्या ठिकाणी बी सी पॉईंट ची मागणी केली आहे त्याठिकाणी जर  ग्राहक सेवा केंद्राचे गरज असल्यास संबंधित ब्रांच मॅनेजर यांनी आपला अर्ज त्यांच्या वरिष्ठ कार्यालयास म्हणजेच  झोनल ऑफिस ला पाठवतात त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याने आपला मिळालेला अर्ज बघून सर्व कागदपत्रे आणि संबंधित बँकेचा  आपण मागणी केलेल्या ठिकाणी बँकेचे ग्राहक सेवा केंद्राचे गरज असलेले शिफारस पत्र दिले असल्यास आपले ग्राहक सेवा केंद्र मंजूर केले जाते.

        आणि त्यानंतर आपल्याला संबंधित बँकेद्वारे किंवा मेल द्वारे कळविण्यात येते.  त्यानंतर पुढील प्रक्रिया चालू केली जाते यामध्ये बँकेचे  बीसी  चालवणारे काही कंपनी आहेत.  त्यांच्यामार्फत आपल्याला ग्राहक सेवा केंद्र दिले जाते.  यामध्ये सदर कंपनीने आपल्याकडून काही अनामत रक्कम घेते आणि त्या मोबदल्यात बायोमेट्रिक डिवाइस.  बॅनर, आणि काही इतर वस्तू देतात आणि त्याच बरोबर आपल्याला त्यांच्यामार्फत ग्राहक सेवा केंद्र घेऊन देतात.


बँकेचे ग्राहक  सेवा केंद्र घेण्यापूर्वी हे आपल्याला लक्षात ठेवणे गरजेचे आहे.


 बँकेचे ग्राहक सेवा केंद्र बी सी पॉईंट घेताना खूप सावधान गिरीने काम करणं गरजेचे आहे.  बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राच्या नावाखाली भरपूर लोकांची लूट होत आहे. यामध्ये आपल्याला काही चुकीचे फोन कॉल येतात किंवा मेल देखील येतात. अशा मेल वर किंवा फोन कॉलवर आपण विश्वास ठेवू नये. आपण जोपर्यंत बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेण्यासाठी स्वतःहून अर्ज करणार नाही.  किंवा बँकेकडे मागणी करणार नाही तोपर्यंत आपल्याला कोणताही बँक बँकेचे ग्राहक सेवा केंद्र देणार नाही.  यासाठी जर कोणीही आपल्याला फोन केल्यास आपण त्यावर विश्वास ठेवू नये यापूर्वी आपण संबंधित बँकेत जाऊन सदर फोन कॉल वर चे आपल्याला सांगण्यात आलेला आहे त्याची शहानिशा करावी त्यानंतर पुढील कारवाई करावी.


 बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रांमधून कोण कोणती सेवा  देता येतात.


 बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून खालील सेवा देता येतात.

      नवीन खाते उघडणे, पैसे जमा करणे, पैसे काढणे, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना करणे, प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना करणे, कर्जाची वसुली करणे,  आरडी एफडी ठेवी करणे,  अटल पेन्शन योजना  अर्ज करणे, सर्व बँकेचे पैसे काढणे, मिनी स्टेटमेंट काढणे, बॅलन्स तपासणे, आरटीजीएस करणे,  कर्जाचे हप्ते जमा करणे,   नवीन कर्जासाठी अर्ज करणे, एटीएम कार्ड साठी रिक्वेस्ट  करणे, चेक बुक साठी रिक्वेस्ट करणे या आणि अजून बऱ्याच सेवा बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रातून दिल्या जातात वेगवेगळ्या बँकेच्या नुसार यामध्ये अजून काही सेवा वाढल्या जातात. 


 बँकेचे ग्राहक सेवा केंद्र  चालकास वेतन किती मिळते.


  बँकेच्या ग्राहक सेवा केंद्र चालकास त्याने केलेल्या व्यवहारा प्रमाणे कमिशन मिळत असून.   कमिशनचे माहिती या ठिकाणी  देणे शक्य नसून. त्या बँकेच्या संकेतस्थळावर तपासून पहावे. सद्यस्थितीला काही ठिकाणी 50 ते 70 हजार रुपये प्रति महिना कमिशन घेणारे सुद्धा बँक बीसी आहेत. या ठिकाणी आपण जितके जास्त ट्रांजेक्शन कराल तितका जास्त आपल्याला कमिशन मिळणार असल्याने आपण जितका जास्त वेळ काम कराल तेवढा वेळ आपल्याला त्याचा मोबदला मिळणार आहे. 






Post a Comment

0 Comments