भारतामध्ये सीएससी ई-गव्हर्नन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत सीएससी केंद्र चालविण्यात येते. भारतातील सर्व राज्यांमध्ये सीएससी चे केंद्र आहेत. सीएससी एक बेरोजगारांसाठी उत्पन्नाचे चांगले साधन असून यातून चांगले उत्पन्न मिळवता येते. सध्या भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये अनेक सीएससी केंद्र चालक असून त्यातून त्यांचा चांगले उदरनिर्वाह होत आहे. यामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी आणि इतर सर्वांसाठी नवीन नवीन सेवा CSC च्या माध्यमातून देता येतात. या अंतर्गत केंद्र सरकारच्या सेवा आहेत आणि काही राज्य सरकारच्या देखील सेवा सीएससी च्या माध्यमातून दिल्या जातात.
सीएससी मधून कोण कोणते सेवा मिळतात?
शासनाच्या सेवा
सी एस सी च्या डिजिटल सेवा पोर्टलच्या माध्यमातून शासनाच्या भरपूर सेवा दिल्या जातात त्यातील काही सेवा खालील प्रमाणे आहेत.
मतदान election
आधार कार्ड
पासपोर्ट
पॅन कार्ड
इ -डिस्ट्रिक्ट
विम्याची सेवा
सी एस सी च्या डिजिटल सेवा पोर्टल च्या माध्यमातून विमा इन्शुरन्स च्या बऱ्याच सेवा दिल्या जातात त्यातील मुख्य सेवा आपण खालील प्रमाणे आहेत.
लाइफ इन्शुरन्स प्रीमियम पेमेंट
इन्शुरन्स सेल
रॅप रजिस्ट्रेशन
VLE इन्शुरन्स रजिस्ट्रेशन
शिक्षण
डिजिटल सेवा च्या सीएससी केंद्राच्या माध्यमातून संगणकाच्या किंवा इतर शैक्षणिक किंवा इतर कोर्सेस घेतल्या जातात त्या खालील प्रमाणे.
सायबर ग्राम योजना
वुमन डिजिटल लिटरसी प्रोग्राम
इ- स्वावलंबीका
NIELIT च्या काही सेवा
NIOS च्या काही सेवा
ऑनलाइन स्पोकन इंग्लिश कोर्स
बेसिक कॉम्प्युटर कोर्स
टॅली सर्टिफाइड प्रोग्राम
इ- पशु चिकित्सा
स्पर्धा परीक्षेचे प्रोग्राम
आणि इतर बऱ्याच शिक्षणाचे सेवा डिजिटल सेवाच्या सीएससी केंद्रा मध्ये दिले जातात.
बँकिंगच्या सेवा
डिजिटल सेवाच्या सीएससी केंद्रातून बँकिंगच्या खालील प्रमाणे सेवा मिळतात.
डीजीपे DIGIPAY
बँकेचे बीसी नेमणे
B2C सेवा
सेवांतर्गत सीएससी केंद्रातून खालील सेवा मिळतात.
बिल पेमेंट
VLE बाजार
आरोग्य संबंधी चे सेवा
कृषी संबंधीच्या सेवा
असे आणि अजून काही सेवा B2C सेवा अंतर्गत दिल्या जातात.
प्रवासाच्या सेवा
प्रवाशांच्या सेवेमध्ये खालील सेवा मिळतात.
बस तिकीट बुकिंग करणे
विमानाचे तिकीट बुकिंग करणे
रेल्वेचे तिकीट बुकिंग करणे
हॉटेल्स बुकिंग करणे
या मुख्य सेवा सीएससी च्या माध्यमातून दिल्या जातात आणि या व्यतिरिक्त अजून बऱ्याच सेवा यात असून तसेच काही नवीन नवीन सेवा येत असतात.
सीएससी केंद्र चालू करण्यासाठी पात्रता काय आहे?
सीएससी केंद्र चालू करण्यासाठी दहावी पास असणे गरजेचे आहे. त्यानंतर संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे अशा सर्व व्यक्तींना सीएससी केंद्र मिळवता येते.
सीएससी केंद्र चालू करण्यासाठी कोणत्या साहित्याची गरज आहे?
सीएससी केंद्र चालू करण्यासाठी आपल्याकडे एक संगणक असणे गरजेचे आहे त्यासोबत एक कलर प्रिंटर, स्कॅनर, वेब कॅमेरा, बायोमेट्रिक डिवाइस, आणि इंटरनेटचे कनेक्शन असणे गरजेचे आहे. त्यासोबत आपल्याकडे पाच ते सहा ग्राहक आपल्या केंद्रात बसतील अशी सोय असलेला गाळा आपल्याकडे असणे गरजेचे आहे. साहित्य आपल्याकडे असल्यास आपल्याकडे सीएससी च्या माध्यमातून जितके सर्विस दिल्या जातात त्या सर्व सर्विसेस आपल्याला देता येतील.
सीएससी केंद्र घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?
सीएससी केंद्र घेण्यासाठी आपल्याकडे खालील कागदपत्रे असणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्या सर्व कागदपत्रांवर नाव जन्मतारीख या सर्व बाबी एक सारखे असणे गरजेचे आहे.
आधार कार्ड
पॅन कार्ड
एक फोटो
बँकेचा चेक किंवा पासबुक
TEC प्रमाणपत्र
इतकी कागदपत्रे आपल्याकडे असल्यास आपण सीएससी केंद्र घेण्यासाठी अर्ज करू शकतात.
TEC प्रमाणपत्र कोठे व कसे मिळवावे?
TEC प्रमाणपत्र हे सीएससी केंद्र घेण्यासाठी बंधनकारक केले असून यासाठी सीएससी केंद्र घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीने प्रथमता TEC प्रमाणपत्रासाठी नोंदणी करावे. त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने एक पेपर द्यावे त्यानंतर पेपर पास झाल्यानंतर आपल्याला एक प्रमाणपत्र मिळेल तोच प्रमाणपत्र आपण सीएससी चा आयडी मिळवण्यासाठी वापरू शकतात.
TEC प्रमाणपत्र मिळण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून फॉर्म भरावे-http://www.cscentrepreneur.in/
सीएससी केंद्र घेण्यासाठी अर्ज कुठे व कसा करावा?
सीएससी केंद्र मिळण्यासाठी खूप सोपी पद्धत असून यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी लिंक असणे गरजेचे आहे. हे नसल्यास आपण बायोमेट्रिक पर्यायाचा वापर करून आपण सीएससी नोंदणी करू शकतात.
याच बरोबर सीएससी नोंदणी करताना आपल्याकडे TEC प्रमाणपत्र देखील असणे गरजेचे आहे.
सीएससी नोंदणी करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा- https://register.csc.gov.in/
सीएससी केंद्र मिळवण्यासाठी नोंदणी करताना खालील गोष्टी लक्षात ठेवावे?
सीएससी केंद्र घेण्यासाठी आपण जर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करत असाल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा आपला अर्ज रिजेक्ट होऊ शकतो. बऱ्याच वेळा काहीजणांनी भरपूर वेळा प्रयत्न करून देखील त्यांना सीएससी केंद्र मिळत नाही याचे कारण खालील प्रमाणे आहे. आपण अर्ज करताना आपण जे कागदपत्रे जोडणारा आहे. त्या सर्व कागदपत्रांवर नावाचे स्पेलिंग जन्मतारीख वगैरे सारखी असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण मॅप वर अक्षांश आणि रेखांश निवडताना अचूक लोकेशन निवडावे. त्यानंतर आपण जे कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणार आहात त्या सर्व कागदपत्रे कॅन झाल्यानंतर स्पष्ट दिसतील याची खात्री करावी. वरील गोष्टी आपण लक्षात ठेवल्यास आपल्याला नक्की सीएससी आयडी पासवर्ड मिळेल.
अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या Youtube ला भेट द्या - Dhanshri Group
0 Comments