सीएससी ई-गव्हर्नन्स इंडिया लिमिटेड ही एक खूप मोठी कंपनी असून यामधून सीएससी सेंटर च्या माध्यमातून भरपूर सेवा दिल्या जातात. आणि हे सीएससी सेंटर महाराष्ट्रात आणि देशभरात भरपूर ठिकाणी आहेत. यामधून शासनाच्या सेवा, इन्शुरन्सच्या सेवा, बँकेच्या सेवा, शिक्षणासंबंधी चे सेवा आणि इतर भरपूर सेवा केंद्राच्या माध्यमातून दिल्या जातात. त्याच मध्ये बँकेचे बीसी म्हणजेच बँकेचे ग्राहक सेवा केंद्र देखील तिच्या माध्यमातून दिल्या जातात. बँकेचे बीसी घेऊन आपण सीएससी केंद्रा सोबतच बँकेच्या सेवा देऊन आपल्या उत्पन्नामध्ये वाढ करू शकता.
सीएससी कडून बँकेचे बीसी घेण्यासाठी पात्रता.
सीएससी कडून बँकेचे बीसी घेण्यासाठी प्रथमता आपल्याकडे सीएससी आयडी असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपले किमान दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यानंतर आपल्याला बँकिंग संबंधित थोडाफार माहिती असणे गरजेचे आहे. अशा सर्व CSC VLE ने बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेता येते.
CSC कडून बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.
सी एस सी कडून जर आपल्याला बँकेचे ग्राहक सेवा केंद्र म्हणजेच बी सी पॉईंट घ्यायची असल्यास आपल्याकडे खालील सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
आधार कार्ड
पॅन कार्ड
सीएससी सर्टिफिकेट
IIBF प्रमाणपत्र ( असल्यास )
चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
शैक्षणिक कागदपत्रे
या सर्व कागदपत्रे आपल्याकडे असल्यास आपण बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेण्यासाठी अर्ज करू शकता.
CSC कडून बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेतल्यास वेतन किती मिळते?
सी एस सी कडून बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेतल्यानंतर आपले जितके ट्रांजेक्शन होतील त्या ट्रांजेक्शन च्या हिशोबा प्रमाणे आपल्याला कमिशन मिळेल. यामध्ये सीएससी व्यतिरिक्त इतर काही कंपन्या बँकेचे ग्राहक सेवा केंद्र देतात त्याच प्रमाणे सीएससी सुद्धा आपला बँकेकडून मिळणारा कमिशन मधून काही टका स्वतः ठेवते आणि बाकीचे कमिशन प्रत्येक महिन्याला आपल्या बँक खात्यात जमा करते.
CSC कडून कोण कोणत्या बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेता येते?
सी एस सी कडून बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, कार्पोरेशन बँक, आंध्रा बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, आय सी आय सी आय बँक, एचडीएफसी बँक आणि काही बँकेचे ग्राहक सेवा केंद्र सीएससी कडून दिल्या जातात.
CSC कडून HDFC Bank आणि ICICI Bank चे ग्राहक सेवा केंद्र कसे मिळवावे?
सी एस सी कडून बँक बीसी घेणाऱ्या इच्छुक VLE ला सर्वांना HDFC बँक आणि ICICI Bank चे ग्राहक सेवा केंद्र देण्यात येत आहेत. आणि हे मिळवणे खूप सोपे असून ज्या VLE बी सी पॉईंट घ्यायची इच्छा असेल त्यांनी आपल्या सी एस सी च्या डिस्ट्रिक्ट मॅनेजरसी संपर्क साधावा. त्यानंतर बी सी पॉईंट मिळण्यासाठी पुढील सर्व प्रक्रिया डिस्ट्रिक्ट मॅनेजर ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे आपण केल्यास आपल्याला वरील दोन्ही बँकेचे ग्राहक सेवा केंद्र लवकरात लवकर मिळू शकते आणि त्यातून आपण चांगल्या प्रकारे काम करून चांगला उत्पन्न सुद्धा मिळू शकता.
CSC कडून इतर सर्व बँकेचे ग्राहक सेवा केंद्र मिळण्यासाठी काय करावे?
ज्या बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालू करायचे असेल. आपण त्या बँकेच्या ब्रांच मॅनेजर कडे बँकेचे ग्राहक सेवा केंद्र मिळण्यासाठी अर्ज करावे त्यासोबत आपले शैक्षणिक कागदपत्रे, संगणकाचे ज्ञान असलेले कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड यांच्याप्रती जोडून अर्ज करावे. त्याच प्रमाणे आपल्याला बँकेचे ग्राहक सेवा केंद्र ज्या ठिकाणी चालू करायचे आहे. त्या ठिकाणचा उल्लेख करावा. त्यानंतर आपण मागणी केलेल्या ठिकाणी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राची गरज असल्यास आपला अर्ज मंजूर होईल त्यानंतर आपल्याला मेल द्वारे किंवा संबंधित बँकेद्वारे कळविण्यात येईल. त्यानंतर आपल्याला कोणत्या कंपनीमार्फत ग्राहक सेवा केंद्र घ्यायची आहे. त्याची विचारणा करण्यात येईल. त्यानंतर आपण जर CSC VLE असाल तर आपण सीएससी कडून बँकेचे बीसी घेऊ शकता अन्यथा आपण दुसऱ्या कोणत्याही कंपनीकडून देखील बँकेचे बीसी घेऊ शकता.
जर आपल्याला CSC कडून बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घ्यायची असल्यास आपण त्याप्रमाणे संबंधित बँकेला कळवावे त्यानंतर बँकेतून आपल्या डिस्ट्रिक्ट मॅनेजर ना मेल केला जाईल आणि पुढील प्रक्रिया देखील त्याच्या मार्फत होईल.
आपल्या जिल्ह्याचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर पुढील लिंक वर क्लिक करून पहावे- CSC DM List
बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेण्यासाठी किती खर्च येईल?
आपल्याला जर बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घ्यायची असल्यास प्रत्येक कंपनीला त्या कंपनीने ठरवल्याप्रमाणे कंपनीला काही डिपॉझिट रक्कम घेतात किंवा काही कंपन्या नॉन रिफंडेबल रक्कम सुद्धा घेतात. यामधून बायोमेट्रिक डिवाइस आणि बॅनर वगैरे दिले जातात.
पण CSC कडून जर बँकेचे ग्राहक सेवा केंद्र घेणार असाल तर यासाठी कोणती सुद्धा रक्कम भरण्याची गरज नसून हे पूर्णपणे फ्री मध्ये दिले जाते.
धन्यवाद !
नवीन ग्राहक सेवा केंद्र मिळवण्याचे अर्ज डाऊनलोड करा. - BOI BC APPLICATION PDF
आमच्या यूट्यूब चॅनेल ला भेट देण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा- https://www.youtube.com/c/DhanshriGroup
आमच्या फेसबुक पेजला भेट देण्यासाठी पुढील लिंक ला क्लिक करा- https://www.facebook.com/DhanshriGroup
0 تعليقات