सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तिला मदत व्हावी यासाठी शासनाने सुकन्या समृद्धी योजना चालू केली. या योजनेअंतर्गत आपल्याला काही रकमेची बचत करून त्याचा फायदा पुढे भविष्यामध्ये घेता येते. या योजनेअंतर्गत मुलीच्या नावाने बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते काढून बचत चालु करता येते.
सुकन्या समृद्धी योजना मध्ये किती रक्कम भरावी लागते?
सुकन्या समृद्धी योजना मध्ये आपण प्रतिवर्षी किमान 250 रुपये ते 1.5 लाखापर्यंत पैसे जमा करता येते. यामध्ये आपण प्रति वर्षाला किमान 250 रुपये इतके तरी रक्कम भरणे अनिवार्य आहे.
सुकन्या समृद्धी योजना मध्ये खाते काढण्यासाठी वयाची अट किती आहे?
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते काढण्यासाठी जास्तीत जास्त दहा वर्षापर्यंतच्या मुलीला सुकन्या समृद्धि योजनेअंतर्गत खाते काढता येते.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत खाते कुठे काढता येते?
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेमध्ये आपण सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत मुलीच्या नावाने खाते उघडता येते.
सुकन्या समृद्धी योजना मधून पैसे केव्हा काढता येते?
सुकन्या समृद्धी योजनेच्या खात्यातून मुलीच्या वयाच्या 18 नंतर उच्च शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी निम्मे पैसे काढता येते. आणि वयाची 21 पूर्ण झाल्यानंतर सर्व पैसे काढता येतात.
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत काढलेला खाता हस्तांतरण करता येते का?
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत काढलेल्या खाता भारतातील कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा कोणत्याही अधिकृत बँकेमध्ये हस्तांतरण करता येते.
सुकन्या समृद्धी योजना मधून मिळणाऱ्या पैशावर किती आयकर लागते?
सुकन्या समृद्धी योजना मधून मिळणाऱ्या पैशावर IT Act under sec. 80C अंतर्गत आयकरात सूट मिळते. आणि आपल्याला कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही.
सुकन्या समृद्धी योजना संबंधित अधिक माहिती साठी- http://www.nsiindia.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
1 تعليقات
The Casino | DrmCD
ردحذفWe also have 동두천 출장안마 the option 진주 출장안마 to open a new casino in Reno (Nv) 창원 출장안마 to 안양 출장마사지 get in-person gambling the casino in Reno, Nevada. The gaming 광명 출장샵